प्रतिनिधी : बापूसाहेब आडसूळ
सोलापूर:स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सभासद नोंदणी अभियान राबविणार असल्याचे स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवक्रांती शिक्षक महासंघ बापूसाहेब आडसूळ यांनी नुकतेच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.त्याच धर्तीवर हरीभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे (दि.१४) रोजी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली व प्रत्येक तालुकाध्यक्षाकडे सभासद नोंदणी फॉर्म देऊन तालुक्यांमध्ये सभासद नोंदणी अभियान घेण्याचे ठरले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे संपर्कप्रमुख प्रा.गंगाधर पडणुरे होते यावेळी प्रा.अमर उमाटे जिल्हाध्यक्ष,प्रशांत नागुरे जिल्हा कार्याध्यक्ष,प्रा.दिगंबर क्षीरसागर सोलापूर जिल्हा सचिव,प्रा.बिरू माने बार्शी तालुकाध्यक्ष,प्रा.विश्वनाथ धानशेट्टी अक्कलकोट तालुकाध्यक्ष,प्रा.नवनाथ वगरे पंढरपूर तालुकाध्यक्ष,प्रा. राजाराम खटके सांगोला तालुका अध्यक्ष,प्रिया सापटणेकर,सुजाता क्षीरसागर जिल्हा समन्वयक या सर्वांचा महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ व इतर पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते निवडी करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ज्ञानदीप शिक्षण समूहाचे व्यवस्थापक वाहिद सय्यद,सचिव मीनाक्षी जाधव,जिल्हाध्यक्ष प्राथ.विश्वनाथ भाग्यवंत,शहर प्रसिद्धीप्रमुख अर्जुन बनसोडे,हनुमंत साळुंखे,अनिता माने,इत्यादी उपस्थित होते प्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष स्वाती खरवले यांनी केले सर्वांचे आभार महिला जिल्हाध्यक्ष डॉ.भाग्यश्री राठोड यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीत घेऊन करण्यात आली.
0 टिप्पण्या