Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या औसा विधानसभा तालुका संघटकपदी किशन भांगे यांची नियुक्ती


प्रतिनिधी: अशोक गरड

औसा:औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे औसा विधानसभा तालुका संघटकपदी किशन भांगे यांची नियुक्ती करण्यात आली.

लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लातूर युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम साळुंखे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते योगीराज पाटील,तालुका अध्यक्ष श्याम साळुंखे,तालुका महिला अध्यक्ष सुनिता भोसले,विधानसभा तालुकाध्यक्ष यशवंत भोसले,विधानसभा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अशोक गरड,विधानसभा तालुका संपर्कप्रमुख रवींद्र योगी,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव,तालुका कार्याध्यक्ष युवक वाशिम भोपले,विधानसभा राष्ट्रवादी सचिव बाळासाहेब कांबळे,विधानसभा युवक तालुका संघटक राजू पटेल,आदित्य भांगे,अजय सगट,शिवाजी कोळी,मंथन सगट,केरनाथ भांगे,शुभम गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या