प्रतिनिधी :अशोक गरड
औसा:औसा तालुक्यातील भादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने (दि.१६) रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे सांगण्यात आले की,भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अशा तक्रारी आले आहेत.तरी आपण अवैध धंदे तात्काळ बंद करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे औसा तालुकाप्रमुख आबासाहेब पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर औसा तालुकाप्रमुख आबासाहेब पवार,विलास काळे,महादेव साळुंखे,प्रदीप शिरसागर,संभाजी साळुंखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या