Ticker

6/recent/ticker-posts

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची खोट्या दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवले असेल तर त्या संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा:दिव्यांग नागरिकांची आयुक्ताकडे मागणी


प्रतिनिधी:सिकंदर शेख 

पुणे: पुणे शहरातील दिव्यांग नागरिकांच्या वतीने दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य डॉ.प्रवीण पुरी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असे सांगण्यात आले आहे की,पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांगतत्वाचा दाखला देऊन IAS अधिकारीची नोकरी प्राप्त केली असेल तर पूजा खेडकर व संबंधित डॉ.आणि यंत्रणांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी.  अशी मागणी रफीक खान यांनी केली आहे. 

दिव्यांग चा संघर्ष जन्मापासुनच सुरु होतो,आणि तो शाळेत,महाविद्यालयात आपले शिक्षण कसे पूर्ण करतो त्यालाच त्याची जाणीव असते,त्यानंतर नोकरी साठी एक अजुन मोठा संघर्ष करावा लागतो.अश्या प्रकार घडल्यामुळे खरा दिव्यांग हक़्क़ा पासून वंचित राहतो,आणि त्याचे परिणाम त्याचा परिवाराला सुद्धा भोगावे लागतात,त्यासाठी या सर्व प्रकरण मध्ये चौकशी समिती गठीत करून दोषी आढळलेल्या सर्व गुन्हेगारवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे.जेणेकरून भविष्यात असे घड़नार नाही. 

आकाश कुंभार यांनी सांगितले की “पूजा खेडकर यांनी जर खोट्या दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत नोकरी मिळवली असेल त्यावर सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास पूजा खेडकर संबंधित डॉक्टर व संबंधित यंत्रणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकरणांमुळे एक खऱ्या दिव्यांग उमेदवारचा हक्क हिरावून घेतला जात आहे असे अजून किती लोक आहेत त्यांनी दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत नोकरी मिळवली आहे.याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. 

यावेळी धर्मेंद्र सातव,सुरेखा ढवळे,सुनंदा बाम्हणे,विष्णूपंत गुंडाळ,सुप्रिया लोखंडे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या