Ticker

6/recent/ticker-posts

पळवून नेलेल्या ३ मुलींचा ए.एच.टी.यू ( AHTU ) कडून शोध घेऊन केली सुटका

प्रतिनिधी : मुदस्सर शेख 

लातूर:अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) शोध मोहिम राबवून पळवून नेलेल्या ३ अल्पवयीन मुलींना पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि लातूर ग्रामीण येथून ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले बाबत दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी किनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले बाबत दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी किल्लारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तसेच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले बाबत दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर दाखल गुन्ह्यांबाबत संबंधित पोलीस स्टेशन सोबतच AHTU कडून समांतर तपास करण्यात येत होता.सदर पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीं बाबत तांत्रिक तपासाच्या साहाय्याने माहिती जमा करून AHTU च्या पथकाने पुणे,छत्रपती संभाजी नगर आणि लातूर ग्रामीण येथे जाऊन तिन्ही अल्पवयीन मुलींना आरोपींसह ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदरची कारवाई सोमय मुंडे,पोलीस अधीक्षक लातूर,अजय देवरे,अपर पोलीस अधीक्षक,लातूर यांचे मार्गदर्शनाखाली दयानंद पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक,एस.एस सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार सदानंद योगी प्रकाश जाधव,महिला अंमलदार यादव व गिरी मॅडम,चालक मनियार सर्वजण नेमणूक AHTU यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या