प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :दि. १०-०७-२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. पासुन सखल मराठा समाज धाराशिव यांचे वतीने धाराशिव शहरात { अहिल्यादेवी होळकर > आण्णाभउ साठे चौक > धारासुर मर्दिनी देवी मंदीर > मदीना चौक > हजरत ख्वॉजा शम्शोद्दीन गाजी दर्गा > विजय चौक बाजार चौक >काळामारुती चौक > पोस्ट ऑफीस > संत गाडगेबाबा चौक > डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक > छत्रपती शिवाजी महाराज चौक } मराठा आरक्षण जनजाग्रण व शांतता रॅलीचे व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक १०-०७-२०२४ रोजी आयोजित रॅली मध्ये धाराशिव जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने लोक पायी व वाहने येण्याची शक्यता असुन रॅली करीता येणारे लोक, त्यांची वाहने व शहरातील वाहतुक यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवून वाहतुकीची कोंडी होऊ नये व लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता रॅली/ सभा मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचेआमचे निदर्शनास आणुन दिले आहे.
त्या अर्थी मी अतुल कुलकर्णी( भ.पो.से.),पोलीस अधीक्षक,धाराशिव मला प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करुन लोकांचे सुरक्षीततेच्या कारणावरुन, खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे बाबत निर्देशित करीत आहे.
दि.१०-०७-२०२४ रोजीचे ०८:०० ते ०४:०० वाजेदरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास(Light& Heavy Vehicles) मनाई करण्यात येत आहे.
१ .मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर/ बेंबळी कडे जाणाऱ्या वाहतुकीला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक > छत्रपती शिवाजी महाराज चौक > देशापांडे स्टँड चौक > आण्णाभाउ साठे चौक > अहिल्यादेवी होळकर चौक > व पुढे बेंबळी टी पॉईट/ फील्टर टाकी पर्यंत मनाई करण्यात येत आहे.
२.तुळजापूर फील्टर टाकी/ बेंबळी टी पॉईंट ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक धाराशिव कडे येणाऱ्या वाहतुकीला बेंबळी टी पॉईट/ फील्टर टाकी > अहिल्यादेवी होळकर चौक > आण्णाभाऊ साठे चौक > देशपांडे स्टँड > छत्रपती शिवाजी महाराज चौक > व पुढे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक पर्यंत मनाई करण्यात येत आहे.
३ . आर्य समाज चौक धाराशिव ते सांजा कडे जाणाऱ्या वाहतुकीला आर्यसमाज चौक > संत गाडगे महाराज चौक > डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक > छत्रपती शिवाजी महाराज चौक > व पुढे SBI बॅक चौक, सांजा रोड पर्यंत मनाई करण्यात येत आहे.
४ . सांजा ते आर्यसमाज चौक धाराशिव कडे येणाऱ्या वाहतुकीला SBI बॅक चौक सांजा रोड > छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मनाई करण्यात येत आहे.
सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.
१ . मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर/ बेंबळी कडे जाणारी वाहतुक शांतीनिकेतन चौक > वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे तुळजापूर व बेंबळी कडे पथक्रमण करतील.
२ . तुळजापूर/ बेंबळी ते धाराशिव शहर कडे येणारी वाहतुक फील्टर टाकी तुळजापूर रोड पासुन >
आयुर्वेदीक महाविद्यालय समोरील हायवे ब्रीज वरुन > वरुडा रोड ब्रीज > शांतीनिकेतन चौक मार्गे धाराशिव शहरात पथक्रमण करतील.
३. आर्य समाज चौक धाराशिव ते सांजा कडे जाणारी वाहतुक आर्य समाज चौक/जिजाऊ चौक>
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक > शांतीनिकेतन चौक > वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे सांजा कडे पथक्रमण करतील.
४.सांजा ते आर्य समाज चौक धाराशिव कडे येणारी वाहतुक SBI बँक चोक सांजा रोड > वरुडा रोड ब्रीज > शांतीनिकेतन चौक >मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे पुढे आर्य समाज चौक/जिजाऊ चौक कडे पथक्रमण करतील.
वरील बंधने ही पोलीस,रुग्ण सेवा,अग्निशामन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने या वाहनांना लागू राहणार नाहीत.
0 टिप्पण्या