प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव: आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये तुळजापूर तालुका अध्यक्ष असलेले मधुकर शेळके यांना पक्षाच्या वतीने मोठे संधी देऊन त्यांना धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ही निवड महाराष्ट्र राज्य प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी नियुक्ती केली आहे.
तसेच जिल्हा सचिवपदी महबूब शेख,जिल्हा उपाध्यक्षपदी मधुकर शेळके ( तुळजापूर ),वसीम खान पठाण ( नळदुर्ग ),तानाजी पिंपळे ( तेर ),राजपाल देशमुख,श्रीकांत भुत्तेकर,सुभाष कशाळे,धाराशिव जिल्हा संघटक मंत्री बिलाल रजवी,मुख्तार शेख यांची नियुक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
त्यानंतर नूतन पदाधिकारी यांना पक्षाचे राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया,प्रदेश कार्याध्यक्ष संग्राम शंकर घाडगे,धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या