Ticker

6/recent/ticker-posts

नीट परीक्षेचे प्रयोजन करून हुशार व खरोखर पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्या:सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांची निवेदनाद्वारे मागणी


प्रतिनिधी : मुदस्सर शेख 

लातूर:लातूर येथे जिल्हाधिकारी यांना सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने या वर्षी नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर भारत सरकार व एन टी ए यांनी साल २०२४ साठी पून: परीक्षा चे प्रयोजन करून हुशार व खरोखर पात्र असलेल्या विद्यार्थ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. 

निवेदनात असे सांगण्यात आले आहे की,या वर्षी नीट २०२४ अर्थात वैद्यकिय शिक्षण राष्ट्रीय प्रवेश व पात्रता परीक्षा देश पातळीवर घेण्यात आल्या.या परीक्षेचा निकाल ०४ जून २०२४ रोजी आला.त्यानंतर आजतागायत या परीक्षेत झालेले घोटाळे एका नंतर एक समोर येत आहेत व यामुळे देशातील जनतेमध्ये या निकालाची विश्वासार्हता संपलेली आहे. त्याची कांही कारणे पुढील प्रमाणे.


१) गुजरात राज्यातील गोध्रा येथील जय जालाराम या परीक्षा केंद्राचा Center Hijacking चा प्रकार.

२) हरियाणा येथील एकाच परीक्षा केंद्रातील तब्बल ६ विद्यार्थी AIR १ (ऑल इंडिया रॉक) आले.

३) चुकीची गुण वितरण पध्दतीमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ असे गुण मिळालेले आहे जे गुण वितरण पध्दतीने चूकीचे आहे.

४) परीक्षेपुर्वी प्रश्नपत्रिकेची Telegram या समाज माध्यमावर तब्बल ३० ते ४० लाख प्रती विद्यार्थी प्रमाणे पेपर विक्री करण्यात आली.

वरील सर्व कारणे पाहता नीट २०२४ निकाल हा भारताच्या तसेच लातूरच्या शैक्षणिक सांस्कृतीला काळीमा फासणारा आहे. यामुळे हुशार होतकरु विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या परीक्षेसाठी मागील बरीच वर्षे घेतलेले मेहनतीवर खूप मोठा अन्याय होत आहे.

तरी जिल्हाधिकारी लातूर यांचे मार्फत भारत सरकार तसेच NTA यांना या निवेदनाद्वारे नीट २०२४ परीक्षा परत घेऊन देशभरातील सर्व विद्यार्थी व पालकांना उचित न्याय द्यावे असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

या निवेदनावर लातूर जिल्हा अध्यक्ष सलीम काझी यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या