प्रतिनिधी: जुबेर शेख
मेडसिंगा: धाराशिव तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ.जाधव मॅडम,नायब तहसीलदार श्री.मुगावे साहेब व मंडळ अधिकारी श्री.डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या मेडसिंगा सज्जाचे उद्घाटन मेडशिंगा ग्रामपंचायतचे सरपंच श्री.अनुरत दूधभाते व गावाचे तलाठी गाढवे एम.बी.यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.किशोर आगळे तसेच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्री.अनुरथ शीत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.तसेच सदरील कार्यक्रमास मेडशिंगा गावचे प्रगतशील शेतकरी दत्ता रणदिवे,ग्रामपंचायत सदस्य महेश लांडगे,कृषी समूह सहाय्यक श्री.रमण आगळे,ज्ञानदेव शित्रे,अजित शित्रे,विष्णू रणदिवे,गणेश उर्फ काजोल शीत्रे,युवराज पाटील,विनोद आगळे आणि उद्धव घाडगे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक हजर होते.
या पूर्वी मेडसिंगा गाव हे देवळाली सज्जा अंतर्गत होते.मागील वर्षी नव्याने निर्माण झालेल्या महसुली सज्जेत मेडसिंगा गावांसाठी स्वतंत्र सज्जा मंजूर करण्यात आला आणि या सज्जा अंतर्गत सकनेवाडी हे गाव देण्यात आले असून याच कार्यालयाचे उद्घाटन गावात करण्यात आले असून या मुळे गावातील नागरिकांना आपल्या कामासाठी गावातच सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या