प्रतिनिधी: जुबेर शेख
तुळजापूर: महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात आज प्रचारास घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरुवात झाली.
यावेळी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच श्री हनुमान यांची पूजा करून शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम च्या घोषणा देऊन शहरातून महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढण्यात आली.
त्यानंतर प्रत्येकाच्या घरात जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तसेच काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या