संपादकीय लेख
जुबेर शेख
धाराशिव:लोकसभा निवडणुकीचे वादळ संपूर्ण राज्यांमध्ये सुरू असताना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस वातावरण तापत आहे. येत्या ७ मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडे ५ मे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी वेळ आहे त्यामुळे सध्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत त्यामध्ये प्रमुख तिरंगी लढत संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे.
या तिरंगी लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.त्यामध्ये महाविकास आघाडी कडून ओमराजे निंबाळकर,महायुतीकडून अर्चनाताई पाटील तसेच वंचित बहुजन आघाडी कडून भाऊसाहेब आंधळकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
या प्रमुख तिन्ही उमेदवाराकडून प्रचारासाठी मोठ्या शर्यतीचे प्रयत्न करण्यात येत आहे.तर गाव खेड्यामध्ये जाऊन उमेदवाराकडून प्रचार करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे,उपनेते नितीन बानगुडे पाटील,आमदार कैलास पाटील हे मैदानात उतरले आहेत.तर खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा (दि.४) रोजी प्रचारासाठी येणार आहेत.
महायुतीचे उमेदवार
त्यातच महायुतीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,अजित पवार,प्रफुल्ल पटेल,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री तानाजी सावंत,कृषी मंत्री धनंजय मुंडे,भाजप नेत्या चित्रा वाघ,राष्ट्रवादीचे शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे,आमदार राणाजगजितसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले,अभिमन्यू पवार हे मैदानात उतरले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहे.
जिल्ह्यामध्ये प्रचाराची रंगधुमाळी ही अंतिम टप्प्यात आली असून सर्वांनीच शेवटच्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त कसा प्रचार करता येईल हे उमेदवाराकडून पाहण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत होणार असून या लढतीमध्ये प्रमुख तीन उमेदवाराची प्रतिष्ठा प्रणाला लागली आहे. तिन्ही उमेदवाराकडून आम्हीच विजयी होणार असे सांगण्यात येत आहे.त्यामुळे ४ जून रोजी जिल्ह्यातील नागरिक कोणत्या उमेदवाराला निवडून देऊन खासदार करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे तसेच उमेदवाराचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या