Ticker

6/recent/ticker-posts

लातुरच्या बरोबरीने धाराशिवला घेऊन जाण्यासाठी ओमराजेना निवडुन द्यावे – अमित देशमुख यांचे अवाहन


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव: जिल्ह्यातुन वेगळा होऊन लातुरचा विकास झाला तिथल्या सहकारी संस्था आजही चांगल्याप्रकारे कार्यरत आहेत, त्याच पध्दतीने धाराशिवला देखील लातुरच्या बरोबरीने घेऊन जायच असल्यास ओमराजे यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.असे मत माजी मंत्री अमित देशमुख यानी व्यक्त केले. ते उमरगा येथील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, अभिजित चव्हाण, धिरज पाटील,प्रदिप कुमार सोनवणे, अश्लेष मोरे, अमर खानापुरे, राजाभाऊ शेरखाने, विलास शाळू महाराज, महेश देशमुख, एम. ओ. पाटील, विजय वाघमारे, विजय दळगडे, संजय चालुक्य, याकुब लदाफ, अजिंक्य मोरे, दिलीप सगर, राजेंद्र तोडकरी, नाना भोसले, विकास हराळकर, याकुब नदाफ, मधुकर यादव, महेश देशमुख, संजय सरवदे, विलास रांजाळे, अभिषेक औरादे, बलभीम पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी श्री.देशमुख म्हणाले की, मराठवाड्याचे मागासलेपण बॅकलॉग भरुन काढायचा असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहवे लागणार आहे. धाराशिव असो की, उमरगा येथे मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे घर फोडले तर शिवसेनेचा पक्ष फोडला काँग्रेसच्याही काही खिडक्या गेल्या आहेत पण आता या खिडक्या बसु द्यायच्या नाहीत असे बोलल्यानंतर उपस्थितानी चांगलीच दाद दिली. खासदार आमदारांना खरेदी केले जाऊ शकते म्हणल्यावर सामान्य मतदार यांनाही खऱेदी करण्याचा प्रयत्न हे महायुतीचे लोक करत आहेत. पण मतदारांना खरेदी करणारा अजुन जन्माला यायचा असल्याचा इशाराही श्री. देशमुख यानी लगावला.  

महायुती कुटुंब

घरातील एकजण भाजपमध्ये दुसरे राष्ट्रवादीमध्ये आहेत. आता एक सदस्यानी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेल्यास महायुतीच घरात आल्याचा वेगळा अनुभव आपल्याला पाहता येईल. त्यामुळे हे महायुती कुटुंब म्हणुन ओळखले जाऊ लागेल असाही टोला त्यानी प्रतिस्पर्धी अर्चना पाटील यांच्या परिवाराला लगावला.

          यावेळी कुणाल राऊत साहेब - युवक प्रदेश अध्यक्ष,अभिजित चव्हाण -प्रदेश सरचिटणीस,धिरज भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष,प्रदिप कुमार सोनवणे, अस्लेश भैय्या मोरे, अमर खानापुरे, राजाभाऊ शेरखाने, विलास शाळू महाराज, महेश देशमुख, एम. ओ. पाटील, विजय वाघमारे, विजय दळगडे, संजय चालुक्य, याकुब लदाफ,अभिजीत चव्हाण, अजिंक्य मोरे, दिलीप सगर, राजेंद्र तोडकरी, पत्रिके साहेब,नाना भोसले, विकास हराळकर, याकुब नदाफ, औ. इनामदार, साखरे साहेब, मधुकर यादव, महेश देशमुख, संजय सरवदे, विलास रांजाळे, अभिषेक औरादे, बलभीम पाटील उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या