प्रतिनिधी :जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील हे आज दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे.त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार आहेत व त्यात उस्मानाबाद लोकसभा उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.
अर्चना पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटक निर्माण करण्याचे काम केले आहे तसेच पुण्यातील महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
पक्षप्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उस्मानाबाद लोकसभेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.पुन्हा एकदा उस्मानाबाद लोकसभेमध्ये निंबाळकर / पाटील परिवारामध्ये सर्वांना लढत पाहायला मिळणार आहे.
0 टिप्पण्या