प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:रमजानच्या पवित्र महिन्यातील सत्तावीसवा उपवास झाला असून या दिवशी तुळजापूर शहरातील जिशान अलिम सय्यद याने रमजानचा पहीला रोजा पूर्ण केला आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा ( उपवास ) करणारे सर्व रोजेदार हे दिवसभर अन्नपाणी न घेता राहतात.यासाठी शारीरिक व मानसिक संयमाची फार आवश्यकता असते.त्याचप्रमाणे इबादत ( उपासना ) करण्यासाठी सुध्दा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते.संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासमय,प्रार्थनामय आणि भक्तमय झालेला असतो.
त्याचप्रमाणे शहरातील मंगळवार पेठ येतील जिशान अलिम सय्यद या ७ वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा ( उपवास ) पुर्ण केला आहे.जिशान सय्यद हे कुलस्वामिनी शाळेत इयत्ता १ मध्ये शिक्षण घेत आहे.सध्या कडक उन्हाळा आहे अशा कडक उन्हाळ्यामध्ये एका लहान चिमुकल्याने रोजा ( उपवास ) धरून पूर्ण केला आहे.
रोजा ( उपवास ) सोडण्यासाठी शहरातील जामा मस्जिद येथे रोजा ( उपवास ) सांय ६:४६ मिनीटांनी सोडला.यावेळी संपूर्ण मुस्लिम बांधवांनी जिशानचे कौतुक केले.जिशानचा पहिला रोजा ( उपवास ) केल्याने त्याचे वडील अलिम करीम सय्यद,काका रहीम करीम सय्यद,सलिम करीम सय्यद यांनी पुष्पहार घालून तसेच सय्यद परिवार तसेच नातेवाईकांनी जिशानचे कौतुक केले.
0 टिप्पण्या