Ticker

6/recent/ticker-posts

लोणी काळभोर येथील दोघा भावांना वीज चोरी करणं पडलं महागात लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल


प्रतिनिधी : सिंकदर शेख 

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लोणी काळभोर शाखेने लोणी काळभोर (ता हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात छापा टाकून सुमारे १७ हजारांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी दोघांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईमुळे लोणी काळभोरसह पूर्ण पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली . याप्रकरणी रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय ३३,रा , मांजरी ग्रीन वूड वसाहत ,शेवाळवाडी ) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, श्रीकांत बाळासाहेब आवारे व गणेश राजेंद्र आवारे (दोघेही ,रा . फुले नगर ,माळी मळा , लोणी काळभोर ,ता हवेली ) या दोघां भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार , रामप्रसाद नरवडे हे महावितरणच्या लोणी काळभोर शाखेत साहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.लोणी काळभोर शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकाकडून वीज बिल थकबाकी वसूली , वीज चोरी चोरी शोधने ,पी .डी. ग्राहकाकडून थकबाकी वसुली करण्याचे आदेश महावितरणच्या उरूळी कांचन उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिले.लोणी काळभोर शाखेचे सहाय्यक अभियंता व कर्मचारी हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात वीज बिल वसुली करत होते. तेव्हा श्रीकांत आवारे हे वीज चोरी करून वापरत असल्याचे दिसून आले. श्रीकांत आवरे यांनी महावितरणचे सुमारे १५ हजार ८४०  रूपयांचे नुकसान केले  तर गणेश आवारे यांनी वीज चोरी  करून महावितरणचे २ हजार रूपयांचे नुकसान केले.

याप्रकरणी रामप्रसाद नरवडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे व पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या