Ticker

6/recent/ticker-posts

लोणी काळभोर येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : सिंकदर शेख 

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक या ठिकाणी (दि.१३) रोजी आरोग्य विभाग व पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२४ ते उद्घाटन रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

१ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी औषधे देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले.

पुढे सांगताना असे सांगितले की १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते हे आजार उद्भवतात नेय यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात.परिसर स्वच्छतेचा अभावामुळे बालक व मुलांमध्ये जंताचा प्रादुर्भाव वाढतो जनता मुळे आणि ॲनिमिया पोट दुखी,उलट्या,अतिसार,मळमणे,भूक मंदावणे,कुपोषण,थकवा,आतड्यात,सूज येणे असे परिणाम बालकावर होतात हे आजार उद्भव नेय यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे गट विकास शिक्षण अधिकारी भूषण जोशी,आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश गोरे,लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर,उपसरपंच प्रियंका काळभोर,माजी उपसरपंच ज्योती काळभोर,राजेंद्र काळभोर,संगीत काळभोर,सविता लांडगे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जे जाधव,रूपाली बंगाळे,कनिष्ठ सहाय्यक महेंद्र खेडेकर,केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप,सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर,पोलीस पाटील दादा पाटील काळभोर,लोणी काळभोर १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना नवसे,लोणी काळभोर २ च्या मुख्याध्यापिका सौ. छाया पवार,उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम,ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या