Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव येथे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व स्वच्छता भारत अभियान मोठ्या उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : सुनील पवार

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे वडगाव येथे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि स्वच्छता भारत अभियान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. 

या कार्यक्रमास ग्रामसेवक नारायण साहेब सरपंच साईनाथ बाबर यांच्या व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष ते गावातील महिला बचत गटाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमास सहभाग नोंदवला.

आपले गाव स्वच्छ करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी या स्वच्छता अभियानास वेळ देऊन आपला सहभाग नोंदवला व संपूर्ण गाव व स्वच्छ करण्यात आले.

यावेळी सुनील पवार,गजानन पवार,विश्लेष जाधव,श्रावण राठोड,शरद राठोड,वसंता जाधव,पप्पू निल्खन तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी यशस्वीपणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पार पाडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या