प्रतिनिधी : सिकंदर शेख

पुणेः पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत मध्ये समाज सुधारक,निसर्गप्रेमी,विज्ञाननिष्ठ,महान शिकवण देणारे संत सेवालाल महाराज यांची जयंती (दि.१५) रोजी लोणी काळभोर गावातील समस्त बंधारा बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.

संत सेवालाल महाराज थोर मानवतावादी संत होते.मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्व दूर मानवी पर्यावरण रक्षक,गोरक्षणाचा संदेश दिला असे मनोगत उपस्थितांनी आणि मांडले. 

यावेळी लोणी काळभोरचे सरपंच योगेश नाना काळभोर,ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळभोर,ग्रामसेवक अधिकारी गवारे,सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर,गीताराम लांडगे,संदीप काळभोर व बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात जयंतीसाठी उपस्थित होते.