प्रतिनिधी : सुनील पवार
अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे वडगाव येथे ( दि.१६ ) रोजी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अभियाना अंतर्गत ग्रामस्वच्छता तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन शिक्षण अधिकारी पाटेकर मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या तपासणी शिबिरास गावातील संपूर्ण नागरिकांनी सहभाग नोंदवून हा संपूर्ण शिबिर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला या शिबिरामध्ये गावातील लहान मोठे ज्येष्ठ तरुण सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास गावातील शिक्षक सुधीर इंगळे तसेच विविध अधिकारी,कर्मचारी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या