Ticker

6/recent/ticker-posts

लोणी काळभोर येथील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन देण्यात आल्या शुभेच्छा


प्रतिनिधी: सिकंदर शेख

पुणे : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात ( दि.२१) रोजी पासून झाली आहे.लोणी काळभोर येथील केंद्र क्रमांक ०५३ पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील हद्दीतील एकूण ५ शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी या केंद्रावरती परीक्षा देत आहेत.

पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व जुनिअर कॉलेज लोणी काळभोर,एंजल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कदम वस्ती लोणी काळभोर,मोडक इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज वडकी,चिंतामणी हायस्कूल व जुनिअर कॉलेज,थेऊर व एमआयटी जुनिअर कॉलेज लोणी काळभोर या ५ जूनियर कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षा केंद्र क्रमांक ०५३ येथे परीक्षा देत आहेत.

एकूण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या १०२३ इतकी आहे. (दि.२१) पासून सकाळी ११ वाजेच्या सुमारास परीक्षा सुरू झाली.त्याआधी केंद्र संचालक अर्जुन कचरे सर तसेच प्राचार्य सिताराम गवळी व सेंट्रल एज्युकेशनल पार्लमेंट कमिटी, दिल्लीचे सदस्य व प्रहार विद्यार्थी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष शिवराज मनोजराव काळभोर व सर्व टीम उपस्थित होते. 

तसेच परीक्षा सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रोत्साहन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या