प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मागील ३ दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तुळजापूर येथील तेजस बोबडे हे मागील २ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास बसले आहेत.
त्यांच्या या आमरण उपोषणास शहर व तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.यावेळी पाठिंबाचे पत्र तुळजापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या वतीने तेजस बोबडे यांना देण्यात आले आहेत.
यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,अमर चोपदार,आकाश शिंदे,दिलीप मगर,शरद जगदाळे,रमेश गायकवाड,अक्षय परमेश्वर,तोफिक शेख,वाहेद शेख,गोविंद देवकर,रुबाब पठाण,चंद्रकांत डावरे,विकास भोसले,ओमकार हरणमारे,शुभम पुजारी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या