Ticker

6/recent/ticker-posts

सेंट्रल एज्युकेशन पार्लमेंट कमिटीच्या सदस्यपदी शिवराज काळभोर यांची नियुक्ती


प्रतिनिधी : सिंकदर शेख 

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील शिवराज मनोजराव काळभोर यांची भारत सरकार अंतर्गत पंजीकृती कृती असलेल्या सेंटर एज्युकेशन पार्लमेंट कमिटी नवी दिल्लीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

निवडीचे पत्र सेंट्रल एज्युकेशन पार्लमेंट कमिटीचे अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

शिवराज काळभोर हे राष्ट्रीय पुरस्कार तसेच महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त करून लोणी काळभोर गावाचे नाव मोठे केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांचे विश्वासू देखील त्यांना मानले जाते.

येणाऱ्या काळामध्ये शिक्षणासंदर्भात काही अडचणी असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास शिवराज काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या नियुक्तीच्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठ व्यक्ती तसेच मित्र कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या