Ticker

6/recent/ticker-posts

मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार?


प्रतिनिधी : सिंकदर शेख 

शिरुर: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी (दि.२९) रोजी शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी पक्ष अंगीकृत संघटना व सर्व शिवसैनिकाची अती तातडीची बैठक बोलवली आसून या बैठकीत महत्वाची घोषणा व निर्णय घेणार असल्याची चर्चा होत आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत उमेदवारी बाबत ते ठाम भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीचे पार्श्र्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ.आमोल कोल्हे हे उमेदवार जाहीर करण्यात आले.मात्र सत्ताधारी भाजप,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गट यांच्याकडून अद्याप पर्यंत शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसल्याचे सदर बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केला असल्याचे बोलले जात असुन उमेदवारी मिळविण्यासाठी मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कार्यकर्त्यांची चर्चा करून अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात सुरू आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ.आमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असून आमदार महेश लांडगे,मा.आमदार विलास लांडे,प्रदिप कंद यांच्या नावाची चर्चा होती.मात्र मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच आमोल कोल्हे यांना जड जाऊ शकतात आशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या