प्रतिनिधी : मिलिंद भांगरे
आंबेगाव:आंबेगाव वसाहत येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचालित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय शाळेचा शासकीय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अ- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ०७ गुण,ब- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ०५ गुण व क- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ०३ गुण एसएससी परीक्षेमध्ये वाढीव मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली.
इंटरमिजिएट परीक्षेत ३० विद्यार्थ्यांन पैकी अ - श्रेणीतून ०५ विद्यार्थी, ब -श्रेणीतून ०५ विद्यार्थी व क- श्रेणीतून २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना वंदना मंडलिक यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे,विश्वस्त पुर्वाताई वळसे पाटील,सभापती प्रकाश राव घोलप,सरपंच प्रमिला घोलप,उपसरपंच परविन पानसरे,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व पालक यांनी केले.
0 टिप्पण्या