Ticker

6/recent/ticker-posts

विवेकानंद हॉस्पिटल लातूर व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न


प्रतिनिधी : मुदस्सर शेख 

लातुर:मौजे हसेगाव येथे शिवश्री फाउंडेशन लातूर संचलित दृष्टी रक्षा प्रकल्प (DRP),विवेकानंद हॉस्पिटल लातूर व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात १०३ रुग्णांची मोफत नेत्र करण्यात आली.या शिबिर अंतर्गत ज्या रुग्णांची नेत्र तपासणी केली आहे.व ज्यांना मोतीबिंदू निष्पन्न झाला आहे अशा रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे मोफत व अल्प दरात करण्यात येणार आहे आणि ज्या रुग्णांना चष्मा लागला आहे व काही औषध उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना शिवश्री फाउंडेशन मार्फत मोफत चष्मा व लागणारे औषध उपचार देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला हासेगावचे सरपंच शालुबाई राठोड,श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे,संचालक नंदकिशोर बावगे,शिवश्री फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास डोलारे,कोषाध्यक्ष अविनाश टेळे,विवेकानंद हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ सचिन मानकुस्कर,जनसंपर्क जनसंपर्क अधिकारी सुजित बोरसुरीकर,नेत्रतज्ञ अंगद शेंडगे,श्रीकांत पूरतवाड,गोपिका सौदागर,तेजस दीक्षित व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,हसेगावचे राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी व सहकारी यांच्या उपस्थितीत झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या