प्रतिनिधी : प्रविन मोरे
पुणे: पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे संघर्ष सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा व विविध तालुक्यातील तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यामध्ये वाहतूक आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी सुरेश विनायक लोखंडे व हवेली तालुका अध्यक्षपदी सिकंदर रफिक शेख यांची नियुक्ती संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष साठे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आप्पा साठे,सचिव पंकज नवनाथ अवताडे,जिल्हाध्यक्ष प्रेम राज पवार तसेच संघर्ष सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या