Ticker

6/recent/ticker-posts

जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास महाराष्ट्रातील सर्व लिपिक बेमुदत आंदोलन करणार


प्रतिनिधी : जुबेर शेख

धुळे: महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषद यांच्या वतीने सरकार व बक्षी समितीचा जाहीर निषेध करण्यात आला यामध्ये समितीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की बक्षी समिती खंड -२ मध्ये लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. बक्षी समिती खंड दोन अहवालावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राज्यातील सर्व शाससकीय निमशासकीय कार्यालयाची ठिकाणी गेट सभा घेऊन शासनाचा व बक्षी समितीचा निषेध नोंदविण्यात येईल. यासाठी धुळे येथे दिनांक १७/०२/२०२३ रोजी राज्य कार्यकारणीची सभा घेऊन निश्चय केला आहे.

या वेळी शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांची वेतन त्रुटी दूर न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व लिपिकांमध्ये निराशेची भावना झाली आहे त्यामुळे तात्काळ या वेतन त्रुटी दूर कराव्या. यासाठी महाराष्ट्रातील लिपिकांनी बेमुदत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत, लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी होत्या. काही विशिष्ट व निवडक संवर्गातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू केल्या आहेत, परंतु बक्षी समिती खंड दोन नुसार अशा समान पदांना समान वेतन श्रेणी लागू न केल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. एक पद एक वेतन श्रेणी मिळाली पाहिजे.

शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिकवर्गीय संवर्गाचा हा सातत्याने वेतन त्रुटी दूर करण्यासाठी झगड़त आहेत.खरे तर बक्षी समितीच्या अहवाला मध्ये लिपिकवर्गीय संवर्गाच्या पदाची वेतन त्रुटी दूर होण्याची फार मोठी अपेक्षा होती. परंतु बक्षी समिती खंड -२ च्या अहवालात लिपिकवर्गीय संवर्गाची वेतन त्रुटी दूर न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व लिपिक बांधवांमध्ये नैराश्य पसरलेले आहे. तरी या वेतन त्रुटी दूर कराव्या यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिपिक बेमुदत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. लवकरच जुनी पेन्शन योजना व शाससकीय निमशासकीय कार्यालया मधील लिपिक वर्गीय संवर्गांचा वेतन त्रुटी तसेच आकृती बंधामध्ये पदे कमी न करणे यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालया मधील सर्व लिपिक लवकरच बेमुदत आंदोलन करणार आहेत. शासनाने वेतन त्रुटी दूर करावी अशी मागणी महाराष्ट्रा राज्य शाससकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेचेसे राज्याचे अध्यक्ष श्री. विजय बोरसे व राज्याचे सचिव श्री. उमाकांत सुरेश सुर्यवंशी यांनी असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी श्री. आर. एस. माळी, श्री. विजय वाघ, श्री. डि. पी. महाले, श्री. वनराज पाटील, श्री. विनोद पाटील, श्री. निलेश देशमुख, श्री. प्रमोद निरगुडे आजी बहुसंख्यने लिपीकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या