प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर: तुळजापूर शहरांमध्ये (दि.१९) रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तुळजापूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
समस्त मुस्लिम बांधव व सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालण्यात आले.
यावेळेस तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,आंदुबर कदम,अविनाश गंगणे,राहूल खपले,आनंद दादा कंदले,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर मगर,रणजीत इंगळे,अमोल कुतवळ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे,युवक तालुकाध्यक्ष संदीप भैया गंगणे,बबन गावडे,किशोर गंगणे,नानासाहेब डोंगरे,दत्ता क्षिरसागर,महेश गवळी,प्रशांत अपराध,नवनाथ जगताप,कुमार टोले तसेच तुळजापूर शहरातील मुस्लिम समाजाचे जेष्ठ हाजी जावेद बागवान,हाजी रसूल बागवान,युसूफ भाई शेख,लालासाहेब तांबोळी,फेरोज भाई पठाण,आरिफ बागवान,तौफिक शेख,अशपाक (सर) आतार,हज्जुमिया आतार,मोहसीन बागवान,मकसूद शेख,रजाक शेख,वाहेद शेख,अशपाक सय्यद,रफिक बागवान,मुसाभाई नदाफ,अशपाक शेख,मतीन बागवाब,जफर शेख,अयाज शेख,कलीम शेख,जमीर (टिल्लू) शेख,जफर शेख,वसीम शेख,पत्रकार सिध्दीक पटेल,जुबेर शेख तसेच शहरातील समस्त मुस्लिम बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या