Ticker

6/recent/ticker-posts

काक्रंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी: अहमद अन्सारी

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे (दि.१९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी काक्रंबा गावचे नवनिर्वाचित सरपंच कालिदास खताळ व माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी भाऊ बंडगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आले.

यावेळी ॲड.निळकंठ वट्टे,युवा नेते नंदकुमार देवगुंडे,सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन भाऊ बंडगर,काक्रंबा गावचे पोलीस पाटील प्रमोद खताळ,ग्रामपंचायत सदस्य विकास भिसे,विकास चंदनशिवे,सद्दाम मुलानी,विनोद साबळे,ज्येष्ठ नागरिक लिंगाप्पा चंदनशिवे,व्यंकट झाडे,शहाजी नन्नवरे,किशोर सोनवणे,पत्रकार रणजित मोरे,अहमद अन्सारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या