प्रतिनिधी : राम थोरात
ठाणे : योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त व्यक्तव्यावरून घमासान सुरू आहे. योगामुळे जगभर प्रसिद्ध असलेले रामदेव बाबा यांची महीलांबद्दल बोलताना जीभ घसरली आहे. पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले कि महिला साडीमध्ये छान दिसतात,सलवार - सुटमध्येही छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही घातले नाही तरी छान दिसतात.
ठाण्यातील हायलँड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आज (दि.२५) रोजी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या.
मागच्या काही दिवसांपासून राज्यात महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत. यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.शिंदे गटाचे अब्दुल सत्तार तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांची प्रकरणे ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
योगगुरु बाबा रामदेव हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी महिलांबद्दल बोलताना अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता राज्यात रामदेव बाबांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर अजून पर्यंत महिला आयोगाच्या वतीने कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही तरी महिला आयोग याची दखल घेऊन कधी घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विशेष म्हणजे बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले. तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदें उपस्थित होते. आता रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महिला साडी सलवारमध्ये छान दिसतात काही घातले नाही तरी छान दिसतात असं रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या