प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तामलवाडी पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 08.10.2022 रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील- किरण दाजी गायकवाड हे 09.00 वा. सु. सांगवी (काटी) शिवारातील जम्मु-पंजाब ढब्यासमोर टायगर जुगार चालवण्याच्या साहित्यासह 5,000 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर सोलापूर येथील- अंबादास सिद्राम म्हैत्रे व सुरज मोहन जमादार हे दोघे 19.50 वा. सु. तामलवाडी शिवारातील कांजन ढाब्यासमोर कल्याण मटका चालवण्याच्या साहित्यासह 2,100 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना पथकास आढळले.
0 टिप्पण्या