Ticker

6/recent/ticker-posts

सर्वात मोठी बातमी ; शिवसेनेचे धनुष्यबाणचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले


पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे

मुंबई: शिवसेनेसाठीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. हे चिन्ह आता ना एकनाथ शिंदे गटाला मिळणार, ना उद्धव ठाकरे गटाला मिळणार. सध्या हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही अशी माहिती समोर येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे ज्या चिन्हावर शिवसेना मोठी झाली आहे तेच चिन्ह आता निवडणूक आयोगाने गोठवल आहे. तसेच मोठी गोष्ट म्हणजे शिवसेना ही नाव आता वापरता येणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या पद्धतीने गोठविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे त्यांच्या गटाला कोणते नाव देणार व कोणते चिन्ह त्यांना मिळणार तसेच एकनाथ शिंदे या गटाला पुढील काळामध्ये दुसऱ्या पक्षात विलीन होणार का नवीन गट काढून त्या गटाला कोणतं नाव देणार व त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणत्या चिन्ह मिळणार हे पाहावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व शिवसेनेचे असलेले चिन्ह धनुष्यबाण गोटवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात दात मागणार का हेही पाहावे लागणार आहे. जर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यास सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

तोपर्यंत आता येणारी निवडणूक ही दोन्ही गटना नवीन नाव व नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे तसेच दोन्ही गटांना आपले नवीन चिन्ह कार्यकर्त्यामध्ये लवकरात लवकर पोहोचवावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या