पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीआधी शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाला निवडणूक आयोगाने गोठवले.
निवडणूक आयोगाच्या आदेशाविरूध्द शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेत आयोगाच्या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच या प्रकरणी सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.
0 टिप्पण्या