उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे
उस्मानाबाद:उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यासाठी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने, आज दिनांक,३० सप्टेंबर २०२२,रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,ऊसतोड कामगाराच्या मागण्या, 1) हार्वेस्टर मशीनला ऊस तोडीसाठी प्रति टन देणारे 450 रुपये मनुष्यबळाशी मिळवून द्यावे, 2) ऊसतोड कामगारांना विमा योजना लागू करावी आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, 3) ऊसतोड कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, 4) ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा शैक्षणिक लाभ मिळवून द्यावे, 5) ऊसतोड कामगारांना कारखाना स्तरावर रेशन उपलब्ध करून द्यावे, 6) ऊसतोड कामगारांना पावसापासून बचाव करण्यासाठी टेंटची सुविधा पायातील घनबूट मिळवून द्यावे, अत्यावश्यक किट, संरक्षण किट मिळवून द्यावे, मुलीचा विवाहासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कर्ज योजना मिळवून देण्यात याव्या, ऊसतोड कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी श्री संत भगवान बाबा शासकीय वस्तीग्रह मिळवून देण्यात यावे, ऊसतोड कामगारांना वृद्धापकालीन योजना लागू करण्यात याव्या, महिलांसाठी आरोग्य सुविधा करण्यात याव्या,तसेच मयत ऊसतोड कामगाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मिळवून देण्यात यावे,अशा 17 ऊसतोड कामगार मयत कामगाराची यादी सादर करण्यात आली आहे,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वरील मागण्या वेळेत मान्य न झाल्यास येत्या १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी संघटनेच्या वतीने हलगी नाद मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार,संदीप झापा पवार,संतोष राठोड, शाशिराव राठोड,राजेंद्र राठोड,सुशिलाबई चव्हान,राजेंद्र रामचंद्र राठोड,नामदेव धेनु पवार, तुकाराम धनाजी चव्हाण,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या