प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर: आज मौजे शहापूर तालुका तुळजापूर येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेतीदिन साजरा केला. सोयाबीन शेतीदिन यामध्ये सोयाबीन काढणी साठी आलेले असल्याने काढणी लवकर करून घ्यावी व चांगला बाजारभाव मिळत असल्यास विक्री करावी. किंवा शेतकऱ्यांची सोयाबीन साठवण्यासाठी शासकीय योजनेद्वारे गोडाऊन उपलब्ध करून देणाऱ्या योजनेबद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली तसेच रब्बी हंगामासाठी महा डी बी टी पोर्टल वर बियाणे साठी अर्ज करावे , कृषिक ॲप वापराबद्दल सांगितले. व शेतकऱ्यांनी आपले उत्पादन कशी वाढवावे याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी श्रीमती डी डी सरवदे श्री डी पी बिराजदार वा कृषि सहाय्यक एन डी मते व गावचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या