काक्रंबा सर्कल प्रतिनिधी :अहमद अन्सारी
काक्रंबा :- तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे काक्रंबा गावचे सरपंच वर्षाताई अनिल बंडगर यांच्या शुभहस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायतने 14 व 15 वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेला कंपाउंड, खेळाचे साहित्य ,घसरगुंडी ,कपाट शालेय पोषण आहार वर्ग खोली दुरुस्ती, प्रत्येक वर्ग शिक्षकाला टेबल, खुर्ची ,कपाट तसेच अँड्रॉइड प्रोजेक्टर अशा अनेक सुविधा शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच वर्षा ताई अनिल बंडगर उपसरपंच अनिल काका बंडगर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत गोविंद देवगुडे, मनोज मोहन घोगरे, अरविंद सिद्धलिंग कानडे, उमेश रमेश पांडागळे ,कांताबाई महादेव ढेरे ,चित्रकला दत्तात्रय कोळेकर, लक्ष्मी रमेश झोंबाडे ,शुभांगी मेघराज साबळे ,दत्तात्रय कोळेकर, तसेच ग्रामसेवक तांबोळी ,ग्रामरोजगार सेवक विनोद साबळे, शिवाजी सुरवसे, अण्णा, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अज्ञान कोरे, किशोर सोनवणे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा उंबरे सहशिक्षिका माया पवार, वर्षा पाठक ,जयश्री चव्हाण, दिपाली परदेशी ,अश्विनी जोगदंड, संजीवनी सरवदे, जगन्नाथ वाघे छगन जगदाळे , अनिल दहीहांडे, सेविका अनुराधा क्षीरसागर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी केले ,आभार प्रदर्शन अनिल दहीहांडे यांनी केले.
0 टिप्पण्या