Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चोरीच्या दोन मोबाईल फोनसह दोन आरोपी ताब्यात

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

स्थानिक गुन्हे शाखा : कर्नाटक येथील- देवराज शिवागा नाईक हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 30.09.2022 रोजी 13.00 ते 14.00 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शन करुन महाद्वारातून बाहेर येत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेउन एका अनोळखी महिलेने देवराज यांची चुलती- सुमाबाई नाईक यांचा अंदाजे 8,500 ₹ किंमतीचा रेडमी मोबाईल फोन पर्ससह हिसकावून चोरुन नेला होता. तर दुसऱ्या घटनेत गणेशनगर, उस्मानाबाद येथील- ज्योती लक्ष्मणराव सस्ते या आज दि. 30.09.2022 रोजी 10.15 वा. सु. तुळजापूर येथील जुने बस स्थानकाजवळील रस्त्याने पायी जात असताना गर्दीचा फायदा घेउन अनोळखी पुरुषाने ज्योती सस्ते यांच्या पर्समधील अंदाजे 18,000 ₹ किंमतीचा सॅमसंग मोबाईल फोन हिसकावून चोरुन नेला होता.


यावरुन देवराज नाईक व ज्योती सस्ते या दोघांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत अनुक्रमे गुन्हा क्र. 349, 350 /2022 हे दोन गुन्हे नोंदवले आहेत.

गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपुण तपास करुन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भानशिवरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर येथील- मनिषा प्रकाश चव्हाण, वय 37 वर्षे हिस श्री. तुळजाभवानी मंदीर महाद्वार समोरुन ताब्यात घेउन तीच्या जवळील नमूद चोरीतील रेडमी मोबाईल फोन हस्तगत केला. तर उस्मानाबाद येथील- शंकर शिवाजी साळुंके, वय 25 वर्षे यास सांजा रोड, उस्मानाबाद येथून ताब्यात घेउन त्याच्या जवळील नमूद चोरीतील सॅमसंग मोबाईल फोन हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह तुळजाहपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- जावेद काझी, प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, सुभाष औताडे, नितीन जाधवर, भालचंद्र काकडे, अजीत कवडे, शौकत पठाण, अशोक ढगारे, शैला टेळे, बलदेव ठाकुर, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या