Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने आमरण उपोषणास सुरुवात


पुणे जिल्हा प्रतिनिधी:- प्रविन मोरे

आज दि:- १५ रोजी महाराष्ट्र नियंत्रण मंडळ कार्यालय पुणे येथे प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुक्याच्या वतिने दि: ०६-०६-२०२२ रोजी प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र नियंत्रण मंडळ यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदन मध्ये असे सांगण्यात आले होते की कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कंपण्यामुळे जल, वायू पासुन प्रदूषण होत आहे त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे प्रदुषण करण्याऱ्या कंपनी वर कार्यवाही नाही झाल्यास दि: १५-०६-२०२२ रोजी पासुन आमरण उपोषण करण्यात येईल. असे निवेदनात सांगण्यात आले होते.
निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत तेथील कोणत्याही कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आज दि:१५-०६-२०२२ पासुन प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुक्याच्या वतिने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयच्या समोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे .आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन कंपनीवर काय कार्यवाही करणार हे पाहावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या