पुणे जिल्हा प्रतिनिधी: प्रविन मोरे
पुणे : कुरकुंभ एम.आय.डी.सी.मधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्या वर होणार कारवाई. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्या कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषणाला प्रहारचे कार्यकर्ते बसले होते. उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप साहेब यांनी तक्रार संबंधित कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण कारवाई होईपर्यंत तात्पुरते मागे घेण्यात आले .
प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात लढा चालूच राहणार . यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष अनंत काळेसाहेब , पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश महाराज राऊत , दौंड तालुक्याचे उपाध्यक्ष रफिक सय्यद ,प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे उपाध्यक्ष विजय आटोळे ,गणेश वाघमारे ,अजित कडू ,भरत मोरे ,अक्षय नांगरे आदी करून प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते .
0 टिप्पण्या