प्रतिनिधी : मिलींद भांगरे
घोडेगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव व आदिवासी विकास विभाग राज्यस्तरीय वर्ग ४ कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात विभागातील चार कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सन्मानित होणाऱ्या सत्कारमूर्ती म्हणजे –
1. श्रीमती फुलाबाई लोहकरे
2. श्री अशोक मोहंडुळे
3. श्री कृष्णा लांडे
4. श्री महंमद शेख
यांचा सत्कार माननीय प्रकल्प अधिकारी श्री. प्रदीपजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ व संपूर्ण पोशाख देण्यात आला.
प्रकल्प अधिकारी श्री. देसाई साहेब यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेस गौरवपूर्वक उजाळा दिला व त्यांचे कार्य मोठ्या कृतज्ञतेने आणि कौतुकाने गौरवले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुरेश दुर्गुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सोनुल कोतवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम केला.
कार्यक्रमात उपस्थित संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खरात यांनी प्रकल्प अधिकारी श्री. देसाई साहेबांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उज्ज्वल व आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्तींनीही आपल्या भावना व्यक्त करत आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते –
सहायक प्रकल्प अधिकारी श्री. कोतवाल साहेब
सहायक प्रकल्प अधिकारी पंढुरे मॅडम
कार्यालयीन अधीक्षक गायकवाड मॅडम
शिक्षण विस्तार अधिकारी दुर्गुडे व शिंदे साहेब
लेखा अधिकारी येळेकर साहेब
पिंटू करे सर (वर्ग ४ आस्थापना टेबल प्रमुख)
संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खरात
उपाध्यक्ष प्रियंका खमसे
सचिव संजय मुंडे
कार्याध्यक्ष प्रवीण काळदंते
राज्यस्तरीय सल्लागार लक्ष्मण मोरे
प्रकल्प मार्गदर्शक रमेश भांगरे
सल्लागार अनिल घुले
दिलीप लोहकरे, अलका भवारी, तुकाराम धुमाळ, एकनाथ डगळे
सह सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व उपस्थित पाहुणे.
या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे – घोडेगाव प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच असे घडले की, सेवानिवृत्त होत असलेल्या सर्वच चार कर्मचाऱ्यांची पेन्शन मंजूर झाल्याची खात्री याच दिवशी मिळाली. याबद्दल प्रकल्प अधिकारी देसाई साहेब, लेखा अधिकारी येळेकर साहेब तसेच आस्थापना टेबल प्रमुख पिंटू करे सर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रम अत्यंत सुसंगत, सुसज्ज आणि भावपूर्ण पद्धतीने पार पडला. या यशस्वी आयोजनामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
0 टिप्पण्या