प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या युवक तालुकाध्यक्षपदी शरद जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण होते. त्यांच्या या नेमणुकीचा जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर कार्यालयात त्यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या सत्कार समारंभात तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते अनिल दादा शिंदे, धनंजय काका पाटील,दिलीप नाना मगर,युवक जिल्हा कार्यध्यक्ष विवेक शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफीक शेख,युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,तसेच आकाश शिंदे,वाहेद शेख,इब्राहिम इनामदार,गणेश नन्नवरे,जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार समारंभात उपस्थित सर्व मान्यवरांनी शरद जगदाळे यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना नेत्यांनी शरद जगदाळे यांच्या कार्यतत्परतेचा आणि युवकांमध्ये असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेचा गौरव केला.
शरद जगदाळे यांनी आपल्या निवडीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आणि तालुक्यातील युवकांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवून संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण तालुक्यात युवकांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून, पक्षाच्या कार्यामध्ये अधिक सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
0 टिप्पण्या