प्रतिनिधी : सुनिल पवार
अकोला : प्रणाली मजबुतीकरण (AIIB) योजने अंतर्गत ३३/११ के.व्ही., ५ MVA क्षमतेच्या नवीन जमकेश्वर उपकेंद्राचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हे उपकेंद्र तालुका बार्शिटाकळी, जिल्हा अकोला येथे उभारण्यात येत आहे.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अनुपभाऊ धोत्रे, खासदार, लोकसभा अकोला यांनी भूषवले. उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा उद्घाटन समारंभ मा. श्री. हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, आमदार, मुर्तिजापूर यांच्या हस्ते पार पडला.
या उपकेंद्राच्या उभारणीमुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक स्थिर, कार्यक्षम व विश्वासार्ह होणार असून, शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिक यांना याचा मोठा लाभ होणार आहे. वीज दाबातील चढ-उतार तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेतून सुटका मिळेल, असे या वेळी वक्त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला विविध मान्यवर, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, स्थानिक जनप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
उपकेंद्राच्या कामाला लवकरच गती देण्यात येणार असून, नियोजित वेळेत हे कार्य पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्याचा मानस महावितरणने व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या