Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश, धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित?


प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे.

सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री धनंजय मुंडे यांची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. 

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा लिहून तयार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ३ मार्च रोजी राजीनामा होणार असल्याचे संकेत दिले होते. 

या प्रकरणात विरोधकांसह महायुतीतील काही आमदारांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर विश्वास व्यक्त केला आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता आहे. 

सध्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवले असता, धनंजय मुंडे यांचा राजीनामा लवकरच होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू असून, पुढील काही तासांत अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या