Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पुजार यांनी पदभार स्वीकारला


प्रतिनिधी :जुबेर शेख 

धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कीर्ती किरण एच. पुजार यांनी आज (दि.२७) रोजी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अहिरराव यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांची आणि सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. नव्या जबाबदारीबाबत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आपल्या भावना व्यक्त करत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

"लोकसहभाग आणि प्रशासन यांची सांगड घालून सर्व स्तरांवरील नागरिकांसाठी प्रभावी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. जिल्ह्यातील विकासकामे, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष लक्ष देऊ," असे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्या नव्या योजना राबवल्या जातील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या