Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर


प्रतिनिधी: जुबेर शेख 

तुळजापूर:तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तालुका कार्यालयामध्ये आज अल्पसंख्यांक विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी एस.टी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,जेष्ठ नेते अनिल शिंदे,दिलीप नाना मगर,युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी निवड कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.

यावेळी धाराशिव अल्पसंख्यांक विभाग तालुका कार्याध्यक्षपदी अमजद शेख,तुळजापूर तालुका अल्पसंख्यांक विभाग विधानसभा उपाध्यक्षपदी चांद नदाफ, अल्पसंख्यांक विभाग तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी जब्बार सय्यद यांची निवड करण्यात आली.

येत्या दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुक लागण्याची दाट शक्यता आहे.त्यातच तुळजापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्यांक विभाग ॲक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळत आहे.येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष मजबुती करण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष तोफिक शेख हे जिल्हा दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.त्यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांचे मुलाखती घेऊन त्यांचे काही प्रश्न असतील ते मिटवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.व ज्या ठिकाणी पदाधिकारी निवड करायचे आहे त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सर्व अल्पसंख्यांक विभागाचे रिक्त पदे भरण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष तोफिक शेख यांनी माध्यमाला सांगितले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार ध्येय धोरण सामान्य घटकांपर्यंत पोहोचवावे तसेच महाविकास आघाडी तुळजापूर विधानसभेसाठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे एक निष्ठने काम करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख यांनी केले.

या निवडीच्या कार्यक्रमासाठी माजी सभापती खराडे,रुबाब पठाण,दिलीप नाना मगर,प्रभारी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, कनगरा गावचे सरपंच गंगणे,उपसरपंच सुरज इंगळे,लालासाहेब शेख,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख,तालुका विधानसभा अल्पसंख्यांक अध्यक्ष इब्राहिम इनामदार,मकसूद शेख,युवा नेते गोविंद देवकर,मोईन शेख,लाईक,मुलानी पीर पाशा,बाबूलाल शेख,मुख्तार शेख,मेहबूब शेख,सय्यद जब्बार,बाबासाहेब खराडे तसेच असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना रुबाब पठाण यांनी केली तर आभार प्रभारी युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या