प्रतिनिधी : जुबेर शेख
परंडा : धाराशिव जिल्ह्यात वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे.यावेळी काहींनी गोळीबार देखील केला आहे. या राड्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून हा प्रकार पूर्व वैमनस्यातून प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेचा तपास सुरु आहे.
परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात आज वाळू व्यावसायिकांच्या दोन गटात राडा झाला आहे. यावेळी गोळीबार देखील झाला आहे.यामध्ये योगेश हनुमंत बुरंगे याच्या कमरेला गोळी लागली आहे.त्यामुळे योगेश गंभीर जखमी झाला आहे. योगेश यास बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या राड्यात कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाले आहेत.दरम्यान या घटनेतील संशयित आरोपी चैतन्य शेळके सह दोघे जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
0 टिप्पण्या