प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना असे सांगण्यात आले की राणादादांनी आणि आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या विकास निधीचा सविस्तर आढावा या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर ठेवला.माझ्या कार्यामुळे आपण सर्वांनी प्रचंड मताधिक्याने मला निवडून देण्यात यावे असे सांगण्यात आले.
आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहरासाठी,तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तसेच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे,कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला.यासारखे आणखी मोठे प्रकल्प लोकसभा क्षेत्रात यावे व लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी 'घड्याळ' या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन या निमित्ताने ताईच्या वतिने करण्यात आले आहे.
यावेळी संपूर्ण ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या