प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने (दि.१६) रोजी रामनवमीनिमित्त तुळजापूर शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम समाजातील नागरिकांसोबत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख तसेच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी उपस्थित समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मस्जिद येथील मौलाना बिलाल रजा,आरिफ बागवान,आयास पठाण,मतीन बागवान,सलीम सय्यद,रहीम शेख,हज्जू शेख,रफिक पठाण,अबुझर शेख,अझहर शेख तसेच तुळजापूर शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते उपस्थित होते.
0 टिप्पण्या