Ticker

6/recent/ticker-posts

थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्यासह दोन खाजगी इसम ७ हजार रुपयांची लाज स्वीकारताना एसीबीच्या रंगेहाथ जाळ्यात


प्रतिनिधी : सिंकदर शेख 

पुणे : थेऊर (दि.१३) रोजी महसूल खात्यातील मोठ्या थेऊरच्या भ्रष्ट व लाचखोर मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना व त्यांच्या खाजगी दोन इसमांना ७ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आटक केली आहे.त्यामुळे हवेली महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसेविका जयश्री कवडे व त्याचे खाजगी इसम योगेश कांताराम तातळे वय २२ वर्ष,खाजगी संगणक ऑपरेटर रा.चौधरी पार्क बाबु कदम चाळ दिघी व विजय सुदाम नाईकनवरे वय ३८ वर्ष,व्यवसाय एजंट रा.नागपूर चाळ येरवडा पुणे आसे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.थेऊर मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्विकारण्यासाठी खाजगी शूटर ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती.मात्र त्यांच्यासह खाजगी शूटरलाच अटक केल्याने तलाठी व थेऊर मंडलाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहे.

लोणी काळभोर तलाठी कार्यालय थेऊर तलाठी कार्यालय.व थेऊर मंडलाधिकारी कार्यालयामधील चुकीच्या कारभाराचा व शेतकऱ्यांकडून लाच मागितले व्हिडिओ व औडिओ क्लिपचा पुरावा प्रशासनापुढे व जनतेपुढे मांडलेला होता.तसेच त्याबाबत नागरिकांनी महसूल च्या वरिष्ठ कार्यालयात व एसीबी कार्यालयात‌‌‌ अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.मात्र कागदी घोडे नाचवण्यापुढे वरिष्ठ अधिकारी काहीही करत नसल्याने नागरिकांमध्ये महसूलच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांची पाठराखण करत होते.त्यामुळे त्यांना एसीबी कडून झालेली अटक हे छोटस हिमनगाचे टोक आसून त्याची व्याप्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.थेऊर मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्विकारण्यासाठी खाजगी शूटर ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती.मात्र त्यांच्यासह खाजगी शूटरलाच अटक केल्याने तलाठी व थेऊर मंडलाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडिलांच्या नावे मौजे कोलवडी,येथे असलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उताऱ्यावरील नाव कमी झाल्याचे दिसून आल्याने त्या नावाची नोंद पूर्ण स्थापित करण्यासाठी तक्रारदार यांची आजी व बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज केला होता.

सदर अर्जावर तहसीलदार यांनी,तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडिलांच्या नावाची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी यांना आदेश दिले होते.

याबाबत गाव कामगार तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदींप्रमाणे ती नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी थेऊर कार्यालय येथे लोकसेविका जयश्री कवडे यांना भेटले असता, लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंदींप्रमाणे आजीच्या आईच्या वडिलांची नोंद मंजुर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या पडताळणी केली असता.थेऊर मंडल अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व खाजगी इसम योगेश नाईकनवरे यांच्या लाच मागणीस लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले.म्हणून खाजगी इसम तातले व नाईकनवरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जयश्री कवडे व त्यांचे दोन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक माधुरी भोसले करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या