Ticker

6/recent/ticker-posts

मौजे पिंजर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मोठ्या उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : सुनिल पवार 

आकोला : बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर येथे (दि.१३) रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत पिंजर प्रभागातील झेप महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली सभेचे प्रास्ताविक पिंजर प्रभागाचे प्रभाग समन्वयक विजय बघेले यांनी सादर करून पिंजर प्रभागातील सर्व समूह,ग्रामसंघ व प्रभागसंघाची माहिती देऊन प्रत्येक गावात महिला बचत गटांना एक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या समोर मागणी केली व त्यावर मान्यवरांनी प्रत्येक गावात बचत गटांच्या कार्यालय साठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.  

तसेच विविध विभागातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.सदर सभेला कार्यक्रमच्या अध्यक्षा म्हणून अनुसयाताई राऊत सदस्य जिल्हा परिषद अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांच्या सोबत संजू भाऊ चौधरी उपसभापती पंचायत समिती बार्शीटाकळी,जावेद खान सदस्य पंचायत समिती बार्शीटाकळी,गंगाधर दराडे ठाणेदार पोलीस स्टेशन पिंजर,नरेंद्र काकडे जिल्हा अभियान व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अकोला,मुरलीधर राखोंडे तालुका अभियान व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती बार्शीटाकळी,आरती बोरेकर जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी,मोनाली देशमुख जिल्हा व्यवस्थापक उपजीविका,संघपाल वाहुरवाघ तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन,शारदाताई पांडुरंग सरपंच ग्रामपंचायत पिंजर,संतोष भाऊ इंगळे अध्यक्ष तंटामुक्ती गाव समिती पिंजर,दीपक सदाफळे अध्यक्ष संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर,विठ्ठल देशमुख केंद्रप्रमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंजर,संकेत भाऊ राठोड सरपंच मोझरी खुर्द,तुषार भाऊ सरपंच महागाव मारखेड,झेप महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष योगिता,बाबाराव मानकर,सचिव संगीता,संतोष वर्हाडे,कोषाध्यक्ष प्रियंका,श्याम खराटे,झेप महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सोनाली,सचिन उंबरकर तसेच झेप महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक,गणेश तळस,तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन,निलेश गायकवाड,प्रभाग समन्वयक महान,अश्विनी नवघरे,प्रभाग समन्वयक राजंदा,ललिता जाधव,प्रभाग समन्वयक कान्हेरी सरप तसेच पिंजर प्रभागातील सर्व ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष सर्व गटाच्या अध्यक्ष सचिव व पिंजर प्रभागातील सर्व कॅडर हजर होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना विनायक लोनाग्रे यांनी केले तर उपस्थित मान्यवर व महिलांचे आभार प्रभाग संघाच्या अध्यक्षा योगिता ताई मानकर यांनी व्यक्त करून सभा समाप्तीची घोषणा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या